Uncategorized
Trending

पोलिसांनी फायरिंग करून केली दोघा अपहृत बालकांची सुटका

बेलगाम प्राईड /अथणी तालुक्यातील कोहळ्ळी येथील हुलगबाळ रोडवरील आपल्या घरी खेळत असलेल्या 4 आणि 3 वर्षांच्या दोन लहान मुलांचे कार गाडीतून अपहरण करून फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघाजणांवर पोलिसांनी फायरिंग अर्थात गोळीबार करून अपहृत मुलांची सुखरूप सुटका केल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे घडली.

सध्या सुरक्षित असलेल्या अपहृत भावंडांची नावे स्वस्ती देसाई आणि वियोम देसाई अशी आहेत. नंबर प्लेट नसलेल्या कार गाडी मधून मुलांचे अपहरण केल्याची घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मुलांचे वडील विजय देसाई यांनी सांगितले की, काल गुरुवारी ते आणि त्यांची पत्नी कामावर होते. त्यावेळी मुलांची आजी घरात एकटीच असताना अपहरणाची घटना घडली. मुलांच्या पालकांनी अथणी पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर भादवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील आणि इतर कांही लोकांमध्ये आर्थिक दृष्ट्या वाद होता यामधून या मुलांचे अपहरण केल्याची घटना घडली असल्याचे पोलिसांचा आढळून आले.

अपहरणाची घटना घडल्यानंतर आज शुक्रवारी पहाटे नंबर नसलेल्या वाहनातून मुलांना घेऊन पळवलेल्या अपहरणकर्ते कोहळ्ळी सिंदूर मार्गे महाराष्ट्राच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी संशयावरून कारगाडी अडवली.

तेंव्हा अपहरणाच्या घटनेचा उलगडा उघडकीस आला. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार अडविल्यानंतर आरोपींनी पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केला. यामध्ये दोन पोलीस जखमी झाले आहेत त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने स्वसंरक्षणार्थ बंदुकीतून गोळीबार करावा लागला. पोलिसांच्या फायरिंगमध्ये अपहरणकर्त्यापैकी एक संशयित जखमी झाला असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. उपचारासाठी अथणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यामध्ये चिकोडी तालुक्यातील अंकली गावचा रविकिरण कमलाकर महाराष्ट्रातील कोल्हापूरचा संभा कांबळे व बिहारचा शाहरुखखान शेख या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत पोलिसांनी अधिक तपास सुरू ठेवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button