
बेलगाम प्राईड/ मैदानाजवळील नेहरू रोडजवळच्या आवारात व्हॅक्सीन डेपो मैदानाजवळील नेहरू रोडजवळ या ठिकाणी एक पक्षी जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती या ठिकाणी असलेल्या अमृता धोंड यांनी समाजसेवक संतोष दरेकर यांना माहिती दिली दरेकर यांनी या ठिकाणी येऊन जखमी अवस्थेत पडलेल्या हॉर्नबिल जातीच्या पक्षाला आपल्या ताब्यात घेऊन वनविभागाच्या अधिकारी मल्लिकार्जुन जटन्नावर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले पक्ष्याच्या पोटाकडच्या बाजूस आणि मानेवर जखमा होत्या.वनखात्याने या पक्षाला औषध उपचार करून त्याची निगा केली जाईल असे संतोष दरेकर यांना आश्वासन दिले. आणि जखमी पक्षाला जीवदान दिल्याबद्दल वनविभागाने संतोष दरेकर यांचे कौतुक केले