
जलतरणपटू इंद्रजीत हलगेकर, लक्ष्मण कुंभार यांचे यश
बेलगाम प्राईड / 20 व्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण चॅम्पियनशिप 2024 मध्ये बेळगावचे जलतरणपटू इंद्रजीत हलगेकर, लक्ष्मण कुंभार यांनी देदिप्यमान यश मिळवले.
भारतीय जलतरण महासंघातर्फे नुकत्याच मध्य प्रदेशातील टीटी नगर-भोपाळ येथील प्रकाश तरण पुष्कर जलतरण तलावात 20 वी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये स्विमर्स क्लब बेळगावच्या मास्टर जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी केली. स्विमर्स क्लबने एकूण 5 पदके जिंकली. यामध्ये इंद्रजीत हलगेकरने २०० मीटर फ्री स्टाईलमध्ये भाग घेत ५० मीटर आणि १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत सुवर्णपदक आणि २ कांस्यपदके जिंकली; तर लक्ष्मण कुंभारने 50 मीटर बटरफ्लाय स्ट्रोकमध्ये रौप्य पदक आणि 50 मीटर ब्रीस्ट्रोक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. या दोन्ही जलतरणपटूंनी अतुट समर्पण आणि कठोर परिश्रम केले. ऑलिम्पिक आकाराच्या सुविधांनी सुसज्ज असलेल्या बेळगावी येथील केएलईच्या सुवर्णा जेएनएमसी जलतरण तलावात त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते. उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर या प्रशिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे. याशिवाय डॉ. प्रभाकर कोरे (चेअरमन, केएलई सोसायटी), श्री. जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), अविनाश पोतदार, श्रीमती. मानेक कपाडिया, श्रीमती. लता कित्तूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलक, आणि इतरांनी त्यांना प्रोत्साहन दिले आहे.