Uncategorized
Trending

मर्कंटाइलच्या स्वरसंध्या कार्यक्रमात दिग्गज भाग घेणार 

बेलगाम प्राईड / गेली सोळा वर्षे सातत्याने महाराष्ट्रातील अनेक गायकांना व कलाकारांना बेळगावात आणून त्यांच्या कलेला वाव देण्याबरोबरच बेळगावकरांची संगीताची भूक भागविणाऱ्या मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने यंदा ज्ञानेश्वरी गाडगे आणि अनुष्का शिकतोडे या उदयनमुख कलाकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. येत्या 21 व 22 जानेवारी रोजी रामनाथ मंगल कार्यालयात सायंकाळी संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री संजय मोरे यांनी या दोन्ही गायकांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांचा कार्यक्रम निश्चित केला आहे.

ज्ञानेश्वरी गाडगे ही ठाण्यातील एका सामान्य कुटुंबातील रिक्षा चालकाची मुलगी असून तिने आपल्या सुमधुर भजने आणि गवळणी द्वारा महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. हिंदी झी चॅनेल वरील सारेगम लिटल चॅम्प मध्ये विनर आहे. ती केवळ आठव्या इयत्तेत शिकत आहे.

अनुष्का शिकतोडे ही महाराष्ट्रातील हास्य जत्रा फेम असून तिचा जादुई आवाज घराघरात पोहोचला आहे. मूळ सोलापूरची असलेल्या अनाशकाने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले असून संगीत विशारद ही आहे. अनेक स्टेज शो तिने केले असून साथिया व मन के परिंदे हे तिचे अल्बम प्रसिद्ध आहेत. सुर नवा ध्यास नवा मध्ये ती फायनलिस्ट आहे. अशा प्रकारच्या या मातब्बर गायिकाना ऐकण्याची संधी बेळगावकरांना मर्कण्टाइल सोसायटीने उपलब्ध करून दिली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button