
बेलगाम प्राईड/ पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन प्रदीप अष्टेकर व मराठा बँकेचे नवनिर्वाचित संचालक दिगंबर पवार यांचा सत्कार सोहळा तरुण मित्रमंडळी भाग्यनगर आरपीडी कट्टा मित्र मंडळ व पिके पी संघ माधवपूर वडगाव आदर्श नगर वासीयांच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी कु. स्पंदना पाटील हीच्या ईश्वस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी श्री मालोजीराव अष्टेकर हे प्रमुख वक्ते म्हणून होते. ते आपल्या भाषणात म्हणाले दोन्ही बँकेतील या सत्कारमूर्तींचे कौतुक केले आजच्या स्पर्धतमक युगात देखील दोन्ही बँकेने प्रगती साधत भागधारकांना भरघोस लाभांश मिळून देत असल्याबद्दल चेअरमन प्रदीप अष्टेकर तर मराठा बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक दिगंबर पवार यांच्या कार्याची प्रशंसा त्यांनी केली.
या कार्यक्रमाच्या वेळी विलास घाडीनी श्री दिगंबर पवार देवकुमार बिर्जेनी प्रदीप अष्टेकर तर मृगेंद्र पट्टणशेट्टीनी यांनी मालोजीराव अष्टेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सत्कारमूर्ती श्री प्रदीप अष्टेकर व श्री दिगंबर पवार यांनी आपल्या भाषणात सरकारच्या जाचक नियमामुळे बँक चालविणे अतिशय मुश्किलीचे झाले असल्याचे सांगून बँकेची प्रगती साधताना भागधारकांचे सकारात्मक सहकार्य असणे गरजेचे असल्याचा दुजोरा त्यानी दिला.
अध्यक्षीय भाषणात श्री देवकुमार बिर्जे हे म्हणाले बँकेची भाग भांडवल धारकाने व खातेदार यांच्या सहकार्यातून प्रगती साधत असल्याने विना सहकार नाही उद्धार अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. सत्कार सोहळा केवळ सत्कार सोहळा नसून हा स्नेहमेळावाचा एक भाग आहे. योग विचारांची देवाणघेवाण नवनिर्वाचित कल्पना नवनवीन सदस्यांचा परिचय होण्यास व आपली कार्यक्षेत्र वाढविण्यास व मदत करण्यास अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आदर्श नगरचे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक व योग शिक्षक श्री मृगेंद्र पट्टणशेट्टी यांनी वयाच्या 85 वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचाही शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला श्री बी बी राव खंडागळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावलेल्या पाहुण्यांचे प्रमुख वक्तेचे व उपस्थित यांचे आभार मानले प्रकाश नंदिहळी यांनी सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाला प्रदीप मुरकुटे, ज्योतिबा अष्टेकर, प्रकाश औंधकर, सतीश गणाचारी, बळीराम पाखरे, प्रदीप चव्हाण, बाबुराव घोरपडे, सुधीर सांबरेकर, प्रभाकर पाटील, शंकर रायबागी, वसंत कंदोळी, सुरेश रैमानाचे, व आनंद चिठ्ठी यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.