
बेलगाम प्राईड : बेळगाव परिसरात एका रियल इस्टेट व्यावसायीकावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज गुरुवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान गणेशपूर बेनकनहळ्ळी परिसरात घडली.या घटनेत प्रफुल बाळकृष्ण पाटील (वय 30) रा. शाहूनगर हा जखमी झाला आहे.
शाहूनगर येथील व्यावसायिक शीटर प्रफुल पाटील हा आपल्या कारगाडीतून बेनकनहळळी येथून गुरूवारी पहाटे कारमधून जातीवेळी याच्यावर जागेच्या व्यवहारातून हा गोळीबार करण्यात आला आहे. ही गोळी दरवाज्याच्या काचा बंद असल्याने काचेवर लागल्याने काचेचे तुकडे त्याच्या चेहऱ्यावर खचले गेले असल्याने हा या हल्ल्यात जखमी झाला आहे. व्यावसायीकवर गोळीबार करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यामधून प्रफुल यामध्ये बचावला गेला आहे.
तथापि हल्लेखोंनी झाडलेल्या गोळ्या कोणत्या बंदुकीतून झाडल्या गेल्या आहेत नेमके कोण आरोपी आहेत याचा तपास सुरू आहे.कारगाडीच्या खिडकीच्या काचेला लागल्यामुळे सुदैवाने रावडी शीटरचे प्राण वाचले आहेत.
प्राण वाचले तरी बंदुकीच्या गोळीमुळे फुटलेल्या काचा चेहऱ्याला, कपाळाच्या एका बाजूला लागल्याने प्रफुल पाटील हा जखमी झाला आहे.त्याला उपचारासाठी केएलई या हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. सदर गोळीबाराची घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली आहे.
पोलिसांनाही ही घटना उशिरा कळल्याने पोलीस सकाळी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी दाखल झाले होते यानंतर हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णाची माहिती घेण्यासाठी इस्पितळात दाखल झाले आहेत. जागेच्या व्यवहारातून अशा सतत घटना घडत असून आणि तेही गोळीबार करून हल्ले केले जात आहेत याची प्रशासनाने गांभीर्याने दक्षता घेणे तितकेच योग्य आहे.