
बेलगाम प्राईड/ चव्हाट गल्ली येथे रंगपंचमी दिवशी जय महाराष्ट्र गीत लावल्याचा ठपका ठेवून मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांनी सोमवारी मुंबई येथे मंत्रालयात पर्यटन मंत्री व सीमाभाग समन्वयक शंभुराजे देसाई यांचे भेट घेतली. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांनी कर्नाटक सरकारकडून मराठी नागरिकांना त्रास होऊ नये या संदर्भात सूचना लवकरात लवकर देण्यात याव्यात असे सूचना देऊ असे आश्वासन आपटेकर यांना दिले. तीन मराठी युवकांवर गुन्हा नोंद झाला आहे. अशाप्रकारे मराठी माणसावर अन्याय होत राहिला
तर येणाऱ्या काळात युवा कार्यकत्यांमध्ये निश्चित संभ्रम व दहशत निर्माण होऊन सार्वजनिक क्षेत्रात त्यांना वावरताना नक्कीच शासकीय अडचणीच्या समोर जावे लागेल त्याचा परिणाम मराठी सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रम घेण्यासाठी कोणी युवा कार्यकर्ते पुढे येणार नाहीत. तर मंत्री महोदयांनी लगेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून यावर नक्कीच योग्य कारवाई करण्यास सांगु असे सांगितले.