बेळगावात पंचमासाली आंदोलन चिघळले : वाहनांवर दगडफेक आंदोलकांवर लाठीचार्ज
या लाटी हल्ल्यात 20 हून अधिक जण गंभीर जखमी

बेलगाम प्राईड / बेळगावात पंचमसाली समाजाचे जनसमुदाय आरक्षणाच्या मागणीसाठी आलेल्या आंदोलकानी सुवर्ण सौधाला घेराव घालणासाठी घुसखोरी केल्याने आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
कुडळसंगम पीठाचे बसव स्वामीजी 2 अ आरक्षणाच्या मागणीसाठी जयमृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात पंचमसाली समाजाने तीव्र विरोध केला आहे. यावेळी आंदोलकांच्या गटाने सुवर्णसौधला घेराव घालण्यासाठी घुसखोरी केली असता पोलिसांनी बॅरिकेड्स ढकलून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. असता आंदोलकांनी बस आणि कारसह अनेक वाहनांवर दगडफेक करण्यात आली. अनेक वाहनांचे नुकसान करण्यात आले.
आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने अतिरेक्यांना नियंत्रित करण्यासाठी एडीजीपी हितेंद्र यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीहल्ल्यात 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल करून उपचार केले. तर दुसरीकडे लाठीचार्ज झाल्याने आंदोलकांचा संताप आणखी वाढला. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.