Uncategorized
Trending
बेळगावच्या भूतरामट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील वाघाचा मृत्यू

बेलगाम प्राईड : बेळगाव भूतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयातील 12 ते 13 वर्षाच्या शौर्य या वाघाचा आजाराने मृत्यू झाला आहे.वन खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शौर्य नावाचा हा वाघ मायकोप्लाझ्मा, सायटॉक्सझोनोसिस आणि बेबेसिओसिस या आजाराने ग्रस्त होता त्याला झालेल्या जटिल संसर्गामुळे रविवारी सकाळी 9.40 वाजता मृत्यू झाला.
वन्यजीव पशुवैद्यकीय तज्ञांशी सल्लामसलत करून वाघावर गेल्या २१ दिवसांपासून वरील आजारांवर उपचार करण्यात आले होते. मात्र त्याचा उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तज्ञां कडून त्या वाघवर उत्तरीय तपासणी करण्यात आली आणि राष्ट्रीय प्राणी संहिता मार्गदर्शक तत्त्वांनुसार मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.