भारतीय व्यक्तीने उभारली शिवाजी महाराजांची मूर्ती

बेलगाम प्राईड /जपान मधील टोकियो मध्ये कसाई भागात एक मराठी विक्रमी व्यक्तीने पुण्यात शनिवार पेठेतील शनिवार पोलीस चौकी जवळ त्यांचा वाडा होता. ती व्यक्ती आता १९९५ ला जपान ची पदवी घेऊन जपान मध्ये गेली आहे. तेथील एका खाजगी शाळेचे मुख्याध्यापक झाले आहेत
त्यांची आई तिथे पुरण पोळी ते साबुदाणा खिचडी अशा विविध पदार्थांचे सर्व भारतीय चटण्या तसेच भारतीय पोशाख पोशाखाचे शिवणकाम करत भारतीय हॉटेल्स व्यवसाय चालवते.
अशा व्यक्तीने टोकियो मधे स्वतः तीन मजली प्रचंड मोठ असे घर बांधलेले आहे. घरात मराठी पुस्तकांची लायब्ररी सुद्धा बनवलेली आहे. तसेच मराठी भाषा शिकवण्याचे काम त्यांनी करतात तसेच सर्व जपानी शाळांना आग्रह धरला जातो. हाच भारतीय मराठी माणूस जपान मध्ये नंतर तेथील लोकप्रतिनिधी (आमदार) बनतात पण सगळ्यावरचा कळस म्हणजे आता त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या घराशेजारी उभारला आहे. पुण्यातील खटावकर यांनी तो तयार केला आहे. त्यांनी तो जपानला विमानाने १० लाख रुपये खर्चून नेण्यात आला आहे. आणि ८ मार्च २०२५ ला तेथे उभाराण्यात आला आहे. यावेळी सुमारे ९०० भारतीय लोक उपस्थित होते. यांच्याकडे सुमारे ३०० महाराजांनी लिहिलेली हस्तलिखित पत्रांचा खजिना देखील आहे. या व्यक्तीचे नांव आहे योगेंद्र पुराणिक