
नवी दिल्ली बेलगाम प्राईड/ चीनमध्ये HMPV विषाणू (china virus) खूप वेगाने पसरत आहे. त्याचा उद्रेक पाहता चीनमधील अनेक राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. चीनच्या अनेक भागात परिस्थिती बिकट झाली. या विषाणूमुळे हजारो लोक असुरक्षित आहेत. वृद्ध आणि लहान मुलांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरत आहे. रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. बाल वॉर्डमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. भारत चीनच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.भारत सरकारही या व्हायरसबाबत सतर्क झाले आहे. सरकारने HMPV बाबत एक सल्लाही जारी केलाय. सरकारने श्वासोच्छवासाची लक्षणे आणि इन्फ्लूएंझा प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने सांगितले की, HMPV प्रकरणांची चाचणी करणाऱ्या लॅबची संख्या वाढवली जाईल. भारत सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलला देखरेख ठेवण्यास सांगितले आहे. याशिवाय भारताने जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) नवीनतम अपडेट्स शेअर करण्यास सांगितले आहे.
यासाठी भारतातील सर्व जनतेने मास्क वापरण्यास प्रारंभ करून या विषाणूसाठी दखल घेतली जावी