
बेलगाम प्राईड/ भारत सरकार मान्यताप्राप्त इंटरनॅशनल ह्युमन डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘प्राईड ऑफ इंडिया’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी बेळगावच्या डॉ. गजानन ए. कांबळे यांची निवड झाली आहे. व्यवस्थापन आणि समाजसेवा या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. कांबळे यांना सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ गोव्यामध्ये येत्या शनिवार दि. 15 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या विद्यापीठ दीक्षांत सोहळ्याचे औचित्य साधून पार पाडला जाणार आहे. याबाबतची माहिती अधिकृत पत्राद्वारे डॉ. गजानन कांबळे यांना कळविण्यात आली आहे.