
बेलगाम प्राईड /बेळगाव शहरातील कागतीवेस रोड येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये एकतर्फी प्रेमातून हॉस्पिटल येथे सेवा बजावणाऱ्या परिचारिकेवर हल्ला केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली.
तेथे सेवा बजावत असलेल्या परिचारीकेने प्रेमास नकार दिल्यामुळे एका तरुणाने नर्सवर प्राणघातक हल्ला केला. गेल्या 30 ऑक्टोबर रोजी घडलेली घटना तेथे असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उघडकीस आली आहे.
प्रकाश जाधव असे आरोपीचे नांव असून त्याने रागाच्या भरात हॉस्पिटलमध्ये नर्सवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्याने फक्त त्या नर्सवरच आघात झाला नाही तर तिच्या कुटुंबावरही खोलवर परिणाम झाला असून याचा परिणाम तिच्या वडिलांच्या मृत्यू झाला आहे.
आरोपी प्रकाश हा त्या परीचारिकेने आपल्या प्रेमाचा स्वीकार करावा यासाठी तिचा पाठलाग करून सतत छळ करत होता. तिच्यावर लग्न करण्यासाठी सतत दबाव टाकत होता. प्रकाशने आपल्या कुटुंबासह नर्सच्या घरी जाऊन लग्नाचा प्रस्तावही दिला होता.
तथापी तिच्या कुटुंबीयांनी हा प्रस्ताव ठामपणे नाकारला. तिने सतत नकार दिल्याने संतप्त होऊन प्रकाशने बॅगेत लपवून आणलेला चाकू घेऊन हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर स्वागत कक्षामध्ये घुसून त्याने सेवेत असलेल्या परिचारिकेवर क्रूर हल्ला केला.
हल्ल्याचा हा संपूर्ण प्रकार हॉस्पिटल मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकाश जाधव याला तात्काळ अटक करून खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी इंडियन कारागृहात करण्यात आली आहे.