
बेलगाम प्राईड /इमारतीच्या बांधकामाची माती भरून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने पोखरल्याने झालेल्या अपघातात 8 वर्षीय बालक ठार झाल्याची घटना वडगाव बाळकृष्ण नगर दुसरा क्रॉस येथे सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
आरुष महेश मोदेकर (वय 8) रा. कणबर्गी बेळगाव असे या अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.आरुष हा आपल्या आई सोबत नातलगांच्या लग्नकार्य समारंभात सहभागी होण्यासाठी कणबर्गी घेऊन वडगाव येथे आला होता.
सोमवारी सायंकाळी लहान मुलांसोबत खेळताना माती भरून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या पाठीमागच्या ट्रॉलीच्या चाकात सापडल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.आरुष हा आपल्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. घटनास्थळी हा अपघात पाहताच आईने हंबरडा फोडलेला तिच्या आईला सांभाळणे नातेवाईकांना कठीण झाले होते.
या घटनेची तक्रार वाहतूक पोलीस सांगतात नोंद झाली असून पोलिसांनी घटनास्थळी येऊन घडलेल्या अपघाताचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवचिकिस्थाकरून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मालकविरोधक चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.यात्रा लग्न समारंभा वेळी पाहुणे नातलगांच्या जाणाऱ्या पालकांनी लहान मुलांकडे सतत लक्ष देण्याची गरज बनली आहे.