Uncategorized
Trending

गुड शेफर्ड’ तर्फे सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेला प्रारंभ

बेलगाम प्राईड : शहरातील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल शाळेच्यावतीने आयोजीत सीबीएसई राष्ट्रीय पातळीवरील स्केटिंग स्पर्धेला शिवगंगा स्पोर्ट्स क्लब व शिवबसवनगर रोड बेळगांव येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.

थाटात पार पडलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या प्रारंभी गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डान्स शो व देशभक्तीपर गीतं सादर केली. प्रमुख पाहुणे युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी एसबीजी ग्रुपचे संचालक अमित घाटगे, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रचिती आंबेकर, उमेश कलघटगी, ज्योती चिंडक, सीबीएसई, निरीक्षक एच. आर. रविश, मुख्य पंच अलोक त्रिपाठी, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळुरकर, इम्रान बेपारी, स्वरूप पाटील आदींसह बेळगावमधील इतर मान्यवर, शाळेचा शिक्षक वर्ग आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

सदर स्पर्धेमध्ये संपुर्ण भारतातील एकूण 9 विभागातून आणि दुबई, कतार, शारजा, युएई या परदेशी विभागातून सुमारे 1000 हून अधिक आघाडीचे स्केटर्स सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एक सीबीएसई निरीक्षक, भारतीय रोलर स्केटिंग महासंघाच्यावतीने 18 ऑफिशियल्स बेलगाम डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असो. च्यावतीने 20 ऑफिशियल्स तसेच गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल चे 45 शिक्षक असे सर्वजण कार्यरत आहेत. स्पर्धेची रिंक रेस शिवगंगा स्पोर्ट्स क्लब आणि रोड रेस शिवबसवनगर रोड बेळगांव येथे होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button