
बेलगाम प्राईड :कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर बेळगाव ऑटो ओनर्स-ड्रायव्हर्स असोसिएशन हिंदू आणि मुस्लिम ऑटो रिक्षा चालकांनी श्री तुळशी विवाह आणि श्री लक्ष्मी पूजनाचे थाटात आयोजन करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले.
बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानका जवळील ऑटो रिक्षा स्टँड येथे आज शुक्रवारी कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर ऑटो रिक्षा मालक -चालक संघटना बेळगावतर्फे श्री तुळशी विवाह व श्री लक्ष्मी पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मार्केट पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णा उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पूजाविधी करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मन्सूर होनगेकर, उपाध्यक्ष गौतम कांबळे, सचिव अब्दुल मेस्त्री, रफीक देवळापुर, अजीम मुल्ला, अब्दुल खादर शेख, मल्लिक मुल्ला, संगप्पा जी. मोईनुद्दीन मोकाशी, बदनायिका, रफीक मणियार, सुरेश रिजकन्नवर, नसरो पाटील, इलियास मुल्ला इतर ऑटो रिक्षा चालक व निमंत्रित उपस्थित होते.