
बेलगाम प्राईड /दुचाकी वरून जाणाऱ्या युवकाचा मोबाईल टिळकवाडी दुसरा रेल्वे गेट नाजिक रस्त्यात पडलेला मोबाईल सेवा बजावीत असलेल्या वाहतूक पोलिसाला आढळून आल्याने मोबाईल मालकाला संपर्क साधून प्रामाणिकपणे परत करण्यात आला.
संतोष दळवी नामक युवक आपल्या दुचाकीवरून जातीवेळी टिळकवाडी दुसरा रेल्वे गेटनजीक त्याचा मोबाईल पडला होता हा मोबाईल तिथे वाहतुकीची सेवा बजावीत असलेल्या दक्षिण वाहतूक पोलीस ठाण्याचे हवालदार शिवानंद टपालदार यांना आढळून आला त्यांनी आपल्या ताब्यात ठेवून घेऊन त्या युवकाशी संपर्क साधण्यात आला संतोष लागलीच सेवा बजावीत असलेल्या टपालदार यांच्याशी येऊन संपर्क साधला असता हवालदार शिवानंद टपालदार यांनी या मोबाईलची सखोल वर्णनाची चौकशी केली असता त्या संतोषने दिलेल्या माहितीशी खातर जमा झाल्याने शिवानंद यांनी मोबाईल मालक संतोष दळवी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला वाहतूक पोलीस हवालदार टपालदार यांनी जपलेल्या माणुसकीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.