जायन्ट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन तर्फे दिव्यांग जलतरण प्रशिक्षणार्थींना अल्पोपहारचे नियोजन

बेलगाम प्राईड /जायंट्स मेन या सेवाभावी संघटनेचे ज्येष्ठ सभासद कैलासवासी तात्या रामचंद्र पवार यांचे चिरंजीव कैलासवासी चंद्रकांत पवार व नात कैलासवासी अवंती पवार यांच्या स्मरणार्थ दिव्यांग मुलांसाठी जलतरण शिबिराचे आयोजन केले होते त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी अल्पोपाराची सोय केलेली होती. संघटनेचे माजी संचालक श्री विश्वास पवार यांनी जायंट्स ग्रुपच्या वतीने गोवावेस येथील जलतरण पुलावर संध्याकाळी ६-३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जायंट्सचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या जलतरण शिबिरामध्ये 50 जणांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. या वेळेला दिव्यांग जलतरणपटूना कशा पद्धतीने जलतरण प्रशिक्षण दिले जाते याचे प्रात्यक्षिक उपस्थित सभासदांनी पाहून प्रशिक्षणार्थी व जलतरण प्रशिक्षक यांचे कौतुक केले. उपस्थित जलतरणपटू व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करताना डॉक्टर विनोद गायकवाड यांनी संयम जिद्द व चिकाटी जोपासल्यास दिव्यांग देखील उच्च पातळीवर चमकु शकतात फक्त त्यांना मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. असे त्यांनी आपले मत व्यक्त केले. यानंतर जायंट्स मेन चे जेष्ठ सदस्य श्री मोहन कारेकर यांनी आबा स्पोर्ट्स क्लब ने घेतलेल्या या उपक्रमाबद्दल प्रशंशा करून समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थित आर एस एस चे श्री राघवेंद्र कागवाड यांनी दिव्यांग मुलांच्या पालकांना आपल्या पाल्यांना खूप प्रेम देऊन त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकून घेऊन समजावून घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला जायंट्स मेंनचे सेक्रेटरी श्री मुकुंद महागावकर, उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष अरुण काळे, डॉ. विनोद गायकवाड, मोहन कारेकर, शिवराज पाटील, अविनाश पाटील, सुनील भोसले, प्रदीप चव्हाण महादेव केसरकर, अशोक, प्रताप पवार अशोक शिंत्रे परशराम मंगनाईक उपस्थित होते. या वेळेला जलतरणपटूंना जॉइंट्स ग्रुप तर्फे अल्पोपहार देण्यात आला. विश्वास पवार यांनी सर्वांचे आभार मानले.