जिल्हास्तरीय हमी योजना अंमलबजावणी समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन

जिल्हास्तरीय हमी योजना अंमलबजावणी समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन
बेलगाम प्राईड / कर्नाटक सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्हा प्रभारी मंत्री माननीय श्री. सतीशना जारकीहोळी यांच्या हस्ते बेळगाव शहरात कर्नाटक सरकारने राबविण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हमी योजना अंमलबजावणी समितीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले.
हमी योजनांच्या तक्रारी व समस्यांना अधिकाऱ्यांनी त्वरित प्रतिसाद द्यावा राज्य शासनाच्या पंच हमी योजनेपासून पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत, या उद्देशाने जिल्हास्तरीय हमी योजना अंमलबजावणी समितीचे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या हमी योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी समितीचे अध्यक्ष, सदस्य व अधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावेत, असे श्री.एच.एम रेवन्ना.यांनी सांगितले बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री.विनय नवलगट्टी हे होते. बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, विविध विभागाचे अधिकारी, हमी समिती सदस्य, तालुकास्तरीय सदस्य व नेते उपस्थित होते.