
बेलगाम प्राईड /क्लब रोड, बेळगाव येथील सीपीएड मैदानावर काँग्रेस पक्षातर्फे येत्या मंगळवार दि. 21 जानेवारी 2025 रोजी आयोजित केलेल्या जय बापू, जय भीम, जय संविधान अधिवेशनादरम्यान सुरळीत रहदारीसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून नागरिकांना विनंती आहे. की त्यांनी नमूद केल्यानुसार पर्यायी मार्ग वापरावा, असे आवाहन बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी केली आहे.
काँग्रेस अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुढील वाहतूक नियम लागू होतील. प्रतिबंधित प्रवेश : दि. 21 जानेवारी 2025 रोजी पुढील मार्गांवर फक्त अधिवेशनाला येणाऱ्या वाहनांनाच परवानगी असेल चन्नम्मा सर्कल, क्लब रोड, गांधी सर्कल, शौर्य सर्कल, शरकत पार्क आणि ग्लोब थिएटर रोड. इतर वाहनांना श्री शनि मंदिर किंवा भातकांडे शाळेचा मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अवजड वाहनांवर बंदी :
दि. 21 जानेवारी 2025 रोजी सकाळी 5 वाजल्यापासून ते अधिवेशन संपेपर्यंत कोणत्याही दिशेकडून शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना शहराच्या हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.