
बेलगाम प्राईड खादरवाडी गावामध्ये प्रांतधिकारी श्रवण नाईक एसीपी गंगाधर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महांतेश शिरेमठ यांच्या समवेत एकत्रित गावामध्ये सर्वप्रथम श्री ब्रह्मलिंग देवाची अधिकाऱ्यांच्या हस्ते पूजा करून त्यानंतर खादरवाडीतील शेतकऱ्यांचा वतीने या सर्व अधिकाऱ्यांच्या पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सत्कार करुन मुख्य बैठकीला सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविक खादरवाडी शेतकरी संघटनेचे प्रमुख राकेश पाटील यांनी केले. मीटिंगमध्ये खादरवडीच्या शेतकऱ्यांनी ठामपणे एकच प्रश्न विचारला जर बुडाची नोटीस येत असेल तर आमदार अभय पाटील यांच्या नातलगांच्या नावे जमीन कशी होते याची आधी चौकशी व्हावी.
त्याचबरोबर ज्या वेळेला खादरवाडीच्या शेतकऱ्यांनी 23 ऑगस्ट 2024 रोजी संपुर्ण गlवसमावेत मोर्चा काडून पोलीस कमिशनर याडा मार्टिन यांच्याकडे या फसवून विकलेल्या 42 एकर जमिनी प्रकरणाबद्दल 9 वेगवेगळ्या तक्रारी पुराव्यानिशी दिल्या होत्या त्याची काही चौकशी झाली नाही. हे विचारले असता AC साहेबांनी याची चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
त्याचबरोबर खादरवाडी येथील शेतकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त करून ज्या 18 लोकांना आम्ही जमीन वाचवण्यासाठी पुढे गेलो कारण हे गावचे सर्व माजी ग्रामपंचायत सदस्य होते. त्याच लोकांनी जमीन विकले यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असे ठाम मत खादरवडीच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
https://www.facebook.com/share/v/19nte8bmeX/
जमीन विश्वासात न घेता दबाव तंत्र वापरून विकली गेली आहे.बुडाची खोटी नोटीस दाखवून रयतेला भेडसाविले जाते जमीन 4 फेब्रुवारी 2023 रोजी विकले आणि नंतर 15 फेब्रुवारी 2024 रोजी जमीन विकल्याचे गावासमोर जाहीर केले. विशाल परशराम धामनेकर याने बनावट खाते काढून पैसे खाल्ले हे प्रकरण सुद्धा या जमिनीच्या प्रकरणाशी निगडित आहे याची चौकशी व्हावी.जो पर्यंत आमचा हा प्रश्न सुटत नाही तेव्हापर्यंत आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मोर्चे निदर्शने करणारच असे ठामपणे सर्व अधिकाऱ्यांना सांगितले.
येणाऱ्या 2024 च्या अधिवेशनात खादरवाडी पासून विधानसभा पर्यंत पायी चालत येऊन मुख्य मंत्र्यांना खादरवाडी प्रकरणाबद्दल निवेदन देऊन चौकशी व्हावी आणि खादरवडीच्या जनतेला न्याय मिळावा यासाठी आंदोलन केले जाणार आहे.असे खादरवाडी शेतकरी संघटनेचे प्रमुख राकेश पाटील यांनी सांगितले . प्रांताधिकार्यानी शेतकऱ्यांना शब्द दिला की या तुमच्या वारीच्या प्रकरणांमध्ये सर्वोतोपरी मदत मी करीन असे आश्वासन दिले. आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे गावच्या वतीने राजेश पाटील यांनी आभार व्यक्त केले. यावेळी खादरवाडी गावातील संपूर्ण शेतकरी महिला आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.