
बेलगाम प्राईड: स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी बेंगलोर येथे आयोजित पहिल्या कर्नाटक शॉर्ट कोर्स पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप -2025 जलतरण स्पर्धेमध्ये 43 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी तब्बल 45 पदके जिंकून स्पर्धेवर वर्चस्व गाजवले.
कर्नाटक पॅरा स्विमिंग असोसिएशन आणि परिश्रम दिव्यांग स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगलोरच्या बसवनगुडी अॅक्वाटिक सेंटर येथे उपरोक्त राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेतील विविध जलतरण प्रकारात पदके संपादन करणारे बेळगावचे यशस्वी जलतरणपटू पुढीलप्रमाणे आहेत. सिमरन गौंडाळकर, अनिकेत पिळणकर, स्वातिक पाटील, अमोल कांबळे, आमोघ तांगडी, प्रज्वल हणमनट्टी, चिन्मय कायमन्नवर, सोनम पाटील, साक्षी पाटील, रम्या लमानी, सौन्दर्य दंडिनावर, पृथ्वी नार्लेकर, प्रज्वल नार्लेकर व शरण्या कुंबार या सर्वांनी प्रत्येकी 3 याप्रमाणे एकूण 42 सुवर्ण पदके, सुप्रिया शिंदोळकर 1 सुवर्ण 1 रौप्य, बुशरा मुजावर 1 कांस्य पदक. सर्व जलतरणपटू बेळगाव येथील केएलईच्या सुवर्णा जेएनएमसी स्विमिंग पूल (ऑलिंपिक आकार) येथे प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर यांच्या देखरेखीखाली पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), एसएलके ग्रुप बेंगलोर, द अलाइड फाउंडर्स प्रायव्हेट लिमिटेड, रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर आणि इतरांचे प्रोत्साहन लाभत आहे.