
बेळगाव /देशपांडे गल्ली येथील रहिवासी रवींद्र नारायण जठार (वय 68) हे कुंभ मेळाव्यासाठी गेले होते. तेथील कुंभमेळ्याचे दर्शन घेऊन दिनांक 29 रोजी परत बेळगावला रेल्वेने येथे वेळी पुण्यात प्रवेश केल्यावर त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचाराचा उपयोग न होता त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पाश्चात पत्नी दोन विवाहित मुलगे सुना नातू असा परिवार आहे.उद्या शुक्रवारी सकाळी 7-00 वाजता सदाशिव नगर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.