
बेलगाम प्राईड : प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात दाखल झालेल्या बेळगावच्या चार भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कुंभमेळा या ठिकाणी घडली आहे.
प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत अनेकजण बेपत्ता आणि जखमी झाल्याचे वृत्त समोर येत असतानाच चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या बेळगावमधील वडगाव येथील ज्योती हत्तरवाड (५०) आणि त्यांची मुलगी मेघा हत्तरवाड या दोघी मायलेकींसह शेट्टी गल्ली येथील अरुण कोपर्डे आणि शिवाजी नगर येथील महादेवी हनुमंत भवनूर या चार भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त मिळाले आहे.
शेट्टी गल्ली येथील अरुण कोपर्डे यांची पत्नी कांचन कोपर्डे यादेखील जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देखील उपलब्ध झाली आहे. या दुर्घटनेतील बेळगावमधील एकूण मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे.
प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत बेळगावच्या वडगाव येथील ज्योती हत्तरवाड आणि मेघा हत्तरवाड या मायलेकी जखमी झाल्याचे वृत्त समजले होते. याचप्रमाणे कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे दाखल झालेले भाविक बेपत्ता झाल्याचेही वृत्त निदर्शनास आली आहे.