
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. गुरुवारी रात्री त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पीटीआय वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. रात्री उशिरा त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे.एम्स रुग्णालयातील डॉक्टरांची एक स्पेशल टीम मनमोहन सिंह यांच्यावर उपचार करत होते. ते गेल्या
अनेक दिवसांपासून आजारी आहेत. याआधी देखील त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंह यांना फुफ्फुसात इन्फेक्शन झालं होते. त्यांना श्वसनास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी एम्स रुग्णालयात दाखल झाले. काँग्रेसची उद्या शुक्रवारी बेळगावात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी हे बेळगावात गेले होते. पण मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने बेळगाव येथील सभा रद्द करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तातडीने बेळगावतून दिल्लीला रवाना झाले आहेत