
बेलगाम प्राईड/ आज रविवारी दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता जळगावच्या प्रसिद्ध आनंदवाडी कुस्ती आखाड्यात,मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्या वतीने कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.आखाड्यात मंडप तसेच मैदानाचे सपाटीकरण करण्यात आले आहे.महिला व पुरुष गटासाठी स्वतंत्र विभाग, महिला, व प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.
गुरूवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, अध्यक्ष मारूती घाडी, डॉ. गणपत पाटील,कार्याध्यक्ष हिरालाल चव्हाण, सेक्रेटरी संतोष होंगल, तांत्रिक कमिटी अध्यक्ष पै. अतुल शिरोले, खजिनदार भरमा पुणुजीगौडा, माजी प्राचार्य सुरेंद्र देसाई, सुहास हुद्दार तसेच अन्य सदस्य आखाडा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सदर मोफत जंगी कुस्ती मैदानाचा बेळगाव आणि परिसरातील कुस्ती शौकिनांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.