
बेळगाम प्राईड- शहर स्वच्छ ठेवण्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना महापालिकेने वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी केले आहे.
प्रभाग क्रमांक 27 मध्ये नगरसेवक साळुंखे यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वितरण करण्यात आले. यावेळी साळुंखे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या बाबत सातत्याने महापालिकेत आवाज उठवला आहे. शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडत आहे. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना महापालिकेने अधिक सुविधा देऊन त्यांना मदत केली पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी दुबई येथील उद्योजक सोमनाथ पाटील, पीव्हीजी ग्रुपचे श्री प्रिन्स, नंदू कंगराळकर रोहित भाकोजी, बसवान गल्लीचे पंच शिवाजी कुरणकर, विनायक कुट्रे, निखिल मासेकर, विक्रम पोटे, संदीप शिंदे,प्रसाद जाधव, पर्यवेक्षक नितीन देमट्टी आधी यावेळी उपस्थित होते.