Uncategorized
Trending

महेश गवळी ‘मि. रॉ क्लासिक’ किताबाचा मानकरी

बेलगाम प्राईड /रॉ फिटनेसच्यावतीने घेण्यात आलेल्या बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग अँड स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित मिस्टर क्लासिक जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेच्या विजेतेपदासह ‘मि. रॉ क्लासिक’ हा मानाचा किताब महेश गवळी याने पटकावला आहे. स्पर्धेतील ‘उत्कृष्ट पोझर’ किताबाचा मानकरी गोकाकचा सागर कळ्ळीमनी ठरला आहे.

भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे शरीर सौष्ठव स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेचा अंतिम निकाल (प्रत्येक गटातील पहिले पाच क्रमांकाचे विजेते यानुसार) पुढीलप्रमाणे आहेत. 55 किलो गट : प्रथम अजिंक्य शिंदे,२) राहुल जी. ३) गणेश जी. ४) दीपक बेळगावकर ५) नितीन हुंदरे

60 किलो गट : 1)रौनिक गवस 2) सागर कळ्ळीमनी 3) अक्षय मुतगेकर 4) अमर सांगलीकर 5) रोहित

65 किलो गट :1) रितिक पाटील 2)जयकुमार एम. 3) सुरज पाटील 4) श्रीधर हुंदरे 5) श्रीनिवास देसुरकर

70 किलो गट : बसाप्पा कोनीकेरी (हिंडाल्को), कपिल कामानाचे (राॅ जीम), ओम पाटील (किल्लेकर जीम),

वसंत जी. (मोरया जीम), विशाल गवळी (मॉर्डन जीम). 75 किलो गट : मनीष सुतार (बेळगाव फिट) हर्ष भालेकर (राॅ जीम), विनीत करडीगुद्दी (रॉ फिट), यल्लाप्पा पाटील (फ्लेक्स). 80 किलो गट : महेश गवळी (रुद्र जीम), आकाश जाधव (राॅ जीम),

आकाश लोहार (रॉ जीम), अनिकेत गडकरी (रुद्र जीम). 80 किलो वरील गट : गजानन काकतीकर (कॉर्पोरेशन जीम), मलिक मुजावर (डिजू फिट), सँडी सेठ (राॅ जीम), किरण जाधव (छत्रपती जिम), सार्थक पाटील (व्यायाम मंदिर).

टायटल विजेता मिस्टर क्लासिक – महेश गवळी (रुद्र जीम). बेस्ट पोझर – सागर कळ्ळीमनी (गोकाक). स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुणे श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, बसनगौडा पाटील, माजी नगरसेवक संजय सुंठकर, सुरेश माने, विजय चौगुले आदींच्या हस्ते पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button