मिनी ऑलिम्पिक जुडो स्पर्धेत जिजामाता हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे यश

बेलगाम प्राईड / बेंगळुरू येथील कंठीरव क्रीडांगण याठिकाणी १४ ते २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मिनी ऑलिम्पिक जुडो स्पर्धेमध्ये जिजामाता हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहे.
जुडो या प्रकारात 57 किलो वजन गटात कु.वैष्णवी संपत भडांगे हिने सुवर्णपदक तर 52 किलो वजन गटात कुमारी आरती दीपक मुरकुटे हिने रौप्य पदक मिळविले आहे. या विद्यार्थिनींना संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन लाभले तर शाळेचे मुख्याध्यापक एन. डी. पाटील व शारीरिक शिक्षिका अश्विनी पेटकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
मराठा मंडळचे संचालक विनायकराव घसारी, जीवन विद्या मिशन मुंबईचे दिलीप मारुती निरमळ, दीपक बिर्जे (सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी) व श्रीमती मधुरा शिरोडकर यांच्या उपस्थितीत शाळेच्या क्रीडांगणावर या विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्र पुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला.