
बेलगाम प्राईड /बेळगाव येथील ‘मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव या महाविद्यालयात दि. २० ते.२२ फेब्रुवारी या तीन दिवसांसाठी विविध स्पर्धा त्याच बरोबर सांस्कृतिक दिवसांचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन सिद्धिविनायक कॉलेज आँफ फार्मासीचे प्राचार्य, डॉ प्राजक्त केंकरे, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले. या प्रसंगी मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मासीचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर, क्रीडा प्रमुख डॉ. महेश भानुशाली तसेच कल्चरल इव्हेंटच्या इंचार्ज संस्ककृतीक कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. सुमा व्यासपीठावर उपस्थित होते. बुद्धीबळ, कॅरम कला प्रकारात रांगोळी, मेहंदी इतर स्पर्धांचा समावेश होता. त्याच बरोबर गायन, नृत्य, रिल मेकींग, वेशभूषा इत्यादी स्पर्धां घेण्यात आल्या अखेर पाककला स्पर्धेने या तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमा दरम्यान मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थीवर्ग तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते..