
बेलगाम प्राईड / पोलीस प्रशासनाच्या वतीने रन फॉर पीस मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी संपूर्ण बेळगाव शहरातून विविध विभागाचे कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थी असे एकूण जवळपास पाच ते सहा हजार स्पर्धक सहभागी झाले होते. रविवारी सकाळी साडेसहा वाजता सीपीएड मैदान येथून आयजीपी डॉ. चैतन्यसिंग राठोर व पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला यानंतर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आयजीपी डॉ. चैतन्यसिंग राठोर यांनी स्वतः देखील दहा किलोमीटर स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा पूर्ण केली.
https://www.facebook.com/share/v/1B8Vjw3Ava/
या स्पर्धेमध्ये संपूर्ण पोलीस अधिकारी यांनीही मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता याचबरोबर या स्पर्धेमध्ये परदेशातून बेळगावला भेटीसाठी आलेल्या परदेशी रहिवासाने यामध्ये भाग घेऊन आपला आनंद लुटला यानंतर त्याने या ठिकाणी नृत्य केले. मॅरेथॉन स्पर्धा संपल्यानंतर युवकांसाठी करमणुकीचा कार्यक्रम म्हणून गाण्याच्या तालावर व्यासपीठावर नृत्य करण्यात आले होते.
शेवटला मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र मेडल व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.