Uncategorized

प्रियांका जार्कीहोळी दोन दिवस बेळगावात दौऱ्यावर

बेलगाम प्राईड : बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या नूतन खासदार म्हणून आणि देशातील सर्वात तरुण खासदार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या प्रियांका जार्कीहोळी सोमवारी 8 जुलै,मंगळवार 9 रोजी रोजी प्रथमच बेळगाव शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत.
प्रियांका यांच्या बेळगाव दौऱ्यात अनेक भेटीगाठी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रियंका यांचे बेळगावात आगमन होताच कित्तूर राणी चन्नम्मा चन्नम्माचौक, छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी उद्यान शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत तत्पूर्वी त्या नागनूर मठाला भेट देणार आहेत.
बेळगाव शहर तालुक्यातील विद्यमान आमदार, माजी आमदार, नगरसेवक यांच्या घरासह अनेक मंदिरांना भेटी देणार आहेत. यात असिफ सेठ, लक्ष्मी हेब्बाळकर, विनय नावलगट्टी,अजीम पटवेगार, एस सी माळगी यांच्या घरी कपिलेश्वर मंदिर, मंगाई मंदिर आदी ठिकाणी त्या भेटी देणार आहेत
प्रियांका जार्कीहोळी यांच्या बेळगाव भेटीच्या पार्श्वभूमीवर कलखांब ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गत लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाल्याने कलखांब ग्रामपंचायतचे सदस्य पिंटू उर्फ मऱ्याप्पा पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये कलखांब गावामध्ये कमी मतदान झाल्यामुळे तसेच गावामध्ये सतीश जार्कीहोळी यांच्या माध्यमातून गावची भरपूर विकास कामे झाली असून गावच्या लोकांनी अतिशय निराश जनक मतदान केल आहे. म्हणुन मी माज्या मर्जीने माझा राजीनामा देत आहे असे पिंटू पाटील यांनी म्हटले आहे.
कलखांब सारख्या गावात मोठ्या प्रमाणत विकास कामे राबवून देखील गावकऱ्यांनी सतीश जारकिहोळी यांना कमी मतदान केले आहे. त्यामुळे मी स्वतः नाराज होऊन ग्राम पंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पिंटू पाटील यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button