प्रवाशांचे दागिने चोरी प्रकरणातील तिघांना अटक

बेलगाम प्राईड/प्रवासादरम्यान दागिने लांबवण्याच्या आरोपाखाली मार्केट पोलिसांनी तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून सात लाखाचे दहा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले असून यामध्ये रिजवाना मिराज पठाण (वय 40) रा. बॉक्साईड रोड विद्यानगर मलिकजान दस्तगीर साहेब शेख (वय 26) विनायक अरुण हिंडलगेकर (वय 32) गांधीनगर असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायबाग तालुका हरुगिरी येथील मीनाक्षी गोपाळ कुषपन्नावर यांचे 30 डिसेंबर 2022 रोजी बेळगाव येथील मध्यवर्ती बस स्थानकातून 100 ग्राम सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली होती. मीनाक्षी यांनी मार्केट पोलीस ठाण्यात याची तक्रार नोंदविली होती तब्बल दोन वर्षानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून यामध्ये तिघांना अटक केली आहे. या तिघांकडून वीस ग्राम सोन्याची चेन 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने 40 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असे मिळून दहा तोळे सोने जप्त केले आहे. पोलीस आयुक्त याडामार्टीन पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महांतेश धामन्नावर उपनिरीक्षक केरूळ व सहाय्यक पोलिसांनी ही कारवाई केली.