
बेलगाम प्राईड /नुकत्याच बेंगलोर येथील हलसूर जलतरण तणावात कर्नाटक राज्य संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय डायव्हिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या ड्रायव्हिंगपटुनी उत्कृष्ट कामगिरी करत आठ पदके संपादन केली आहेत
मुलांच्या ग्रुप मध्ये मयुरेश जाधव याने 1 मीटर व 3 मीटर डायव्हिंग प्रकारात दोन सुवर्ण पदके संपादन केली. युवराज मोहनगेकर याने ग्रुप तीन मध्ये 1 मीटर व 3 मीटर स्प्रिंग बोर्ड ड्रायव्हिंग मध्ये दोन सुवर्ण पदके संपादन केली नील मोहिते याने ग्रुप दोन मध्ये 1 मीटर व 3 मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग मध्ये दोन कांस्य पदके संपादन केली. तन्वी कारेकर हिने 1मीटर व 3 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग मध्ये दोन रौप्य पदके संपादन केली. वरून जोगमन्नावर, प्राची कदम, तनवी मुचंडी, श्रेया जोगमनावर, यांनी प्रदर्शनीय डायव्हिंग मध्ये भाग घेऊन प्रशस्तीपत्र व मेडल संपादन केले.
वरील सर्व डायव्हिंगपटूंना एन आय एस जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार, शिवराज मोहिते, संदीप मोहिते, यांचे मार्गदर्शन लाभते तर क्लबचे पदाधिकारी अँड मोहन सप्रे, शितल हुलबत्ते, अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन लाभते.