राज्यस्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेचे मोठ्या थाटात उद्घघाटन 2024

राज्यस्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेचे मोठ्या थाटात उद्घघाटन 2024
बेलगाम प्राईड /सार्वजनिक शिक्षण खाते बेळगावी यांच्या वतीने 14 व 17 वर्षाआतील मुला व मुलींची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक 5 व 6 ऑक्टोबर रोजी शिवगंगा स्पोर्टस क्लब ओम नगर बेळगावी येथे आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेसाठी कर्नाटक येथून 18 जिल्हा मधून सुमारे 200 च्या वर स्केटर्स सहभागी झाले होते या स्पर्धे मध्ये विजयी व निवड झालेल्या स्केटर्स ची स्कूल गेम्स राष्ट्रीय स्पर्धसाठी निवड केली जाणार आहे या स्पर्धेचे उद्घघाटन बेळगावी डीडीपीआय लीलावती हिरेमठ यांच्या शुभ हस्ते झाले ,या वेळी डीएसपीओ जुनेद पटेल , ज्योती चिंडक,रमेश सिंगद , पीईओ साधना बद्री ,नागराज भगवंतनवर, श्री आरवोळे, एस गंभीर,श्री पाटील,श्री पटेल, ईतर मान्यवर व स्केटींग पद्दू ,पालक, प्रशिक्षक मोठया प्रमाणात उपस्थित होते यावेळी लीलावती हिरेमठ, ज्योती चिंडक,
श्री अनिल व महेन्द्र सर यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक विश्वनाथ येलुरकर ,योगेश कुलकर्णी, विठ्ल गंगणे, अनुष्का शंकरगौडा,सोहम हिंडलगेकर , श्री रोकडे,तेजस सांळुखे, ऋषीकेश पसारे, स्वरूप पाटील व बेळगावी जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते व बेलगाम डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असो यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरपुर परिश्रम घेतले.