शहापूर पोलिसांच्या छाप्यात गोवा बनावटीचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त

बेलगाम प्राईड / शहापूर पोलिसांनी आज हुलबत्ते कॉलनीतील एका घरावर छापा टाकून गोवा बनावटीचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी महाद्वार रोड येथील रहिवासी सुभाष सुधीर डे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुभाष सुधीर डे यांनी हुलबत्ते कॉलनीतील आपल्या नातेवाईकांच्या घरात गोवा बनावटीच्या 1,37,681 रुपये किंमतीच्या 313.3 लिटर दारू बाटल्या दडवून ठेवल्या होत्या. याची कुणकुण पोलिसांना लागली.. पोलिसांनी छापा टाकून हा अवैद्य दारूसाठा जप्त केला आणि याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यान्ग, उपायुक्त रोहन जगदीश, उपायुक्त निरंजन राज अर्स, मार्केट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. एस. सिमानी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
धाड पथकात नागराज ओसप्पगोल, संदीप बागडी, जगदीश हाडिमणी, श्रीधर तळवार, श्रीशैल गोवावी, सुरेश लोकुरे, अजीत शिपुरे, सिद्धरामेश्वर मुगळखोड आणि विजय कमते या पोलिसांचा समावेश होता.