
बेलगाम प्राईड /बाजारपेठेतील थकीत असलेल्या कर वसुलीसाठी तसेच स्वच्छते संदर्भात बेळगाव महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी सोमवारी सकाळी शहरातील झेंडा चौक मार्केट, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, मारुती गल्ली, देशपांडे गल्ली, टिळक चौक असा परिसराचा पाहणी दौरा करून उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी आज सोमवारी सकाळी 8:00 वाजण्याच्या सुमारास शहरातील मध्यवर्तीय बाजारपेठेचा परिसर असलेला भागाचा पाहणी दौरा केला.
झेंडा चौक मार्केट परिसराची संपूर्ण पाहणी करताना मनपा आयुक्तांनी तेथील महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केटला देखील भेट देऊन सदर मार्केटसंदर्भात न्यायालयात सुरू असलेल्या वादाबद्दल माहिती जाणून घेतली. आपल्या दौऱ्याप्रसंगी त्यांनी संबंधित परिसरात ठीक ठिकाणी कचरा टाकला जातो? व्यापारी, दुकानदार भाजी विक्रेते आपला ओला कचरा कुठेही टाकतात? यासाठी व्यापाऱ्यांनी आपल्या आपल्या दुकान समोर कचरा टाकण्यासाठी कचरा डब्याची व्यवस्था केली जावी असा संदेश त्यांनी दिला. रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांसाठी पाणपोईची सोय आहे का? अशा विविध समस्यांच्या संदर्भात माहिती आयुक्तांनी जाणून घेतली. तसेच वेळच्यावेळी ओल्या व सुक्या कचऱ्याची स्वतंत्र उचल करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काय करायला हवे? या संदर्भात आयुक्त शुभा यांनी उपस्थित स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांची मते जाणून घेतली. त्यानुसार सोबत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
https://www.facebook.com/share/v/1AC565yCPk/ ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com /ISbnrogbYkT0t3FhYM8xao
बाजारपेठेत सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय करणे. झेंडा चौकातील भाजी मार्केटचा न्यायालयीन वाद सुरू असल्यामुळे तेथील स्वच्छतागृह बंद आहे. परिणामी भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसून भाजी विकावी लागत आहे. त्यांच्यासाठी कट्टे तयार करून व्हेन्डर्स झोनची निर्मिती करणे. झेंडा चौकातील महिलांसाठी असलेले स्वच्छतागृह (पिंक टॉयलेट) बांधून 2 वर्षे झाली तरी पाण्याची सोय नसल्यामुळे ते बंद ठेवण्यात आले आहे.
त्या ठिकाणी पाण्याची सोय करणे. त्याचप्रमाणे नरगुंदकर भावे चौकात कंबळी खुट येथे पे अँड युज टॉयलेट्स अर्थात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणे यासंदर्भात नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांनी आयुक्तांना माहिती दिली. त्यावेळी सदर मागण्यांसंदर्भात टप्प्याटप्प्याने पाहणी करून निर्णय घेतला जाईल असे आयुक्त शुभा बी. यांनी सांगितले.
त्यासाठी पुढील 15 दिवसात पुन्हा पाहणी दौऱ्यासाठी येऊ असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत महापालिका सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, मध्यवर्तीय व्यापारी बंधू संघटनेचे अध्यक्ष विकास कलघटगी, महापालिकेचे आरोग्य अधिकारी नांद्रे, पर्यावरण अभियंता कलादगी, आदिल खान, अभियंता अनुप आदीसह स्थानिक नागरिक, व्यापारी व दुकानदार उपस्थित होते.