शिवजयंती चित्ररथ मिरवणूक रंगभूषा : इच्छुकांसाठी आवाहन

बेलगाम प्राईड/ दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समिती, सकल मराठा समाज आणि श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणुकी मधील जिवंत देखाव्यांमध्ये सहभागी होणाऱ्या बेळगावातील कलाकारांसाठी मोफत मेकअप अर्थात रंगभूषा उपक्रम राबविला जाणार आहे.
बेळगाव शहर आणि शहापूर वडगाव भागातील श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणुकीतील सहभागी कलाकारांसाठी असणाऱ्या या उपक्रमा संदर्भात श्री शिवजयंती उत्सव मंडळांनी किंवा संबंधित कलाकारांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा उपक्रम नेताजी सुभाष चंद्रबोस हॉल
डबल रोड नाथ पै चौक शहापूर बेळगाव या ठिकाणी हाती घेतला जाणार आहे. तेंव्हा या उपक्रमाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी सागर पाटील 9964777565 महादेव पाटील 94815 35528 गुणवंत पाटील 97408 68181(सकल मराठा समाज) अथवा भरत नागरोळी 99720 75921 (श्री राम सेना हिंदुस्थान) आणि उदय बामणे 93417 25739 यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.