
बेळगाव / बेळगुंदी येथील रहिवासी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर कार्यकर्ते शट्टूपा भावकू चव्हाण यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. 1986 सालच्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात धारातीर्थी पडलेल्या भावकू चव्हाण यांचे ते चिरंजीव होते. ते बेळगुंदी येथील ग्रामस्थ कमिटीचे माजी अध्यक्ष होते. तसेच तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व लढ्यांमध्ये सहभागी होणारे सक्रिय कार्यकर्ते होते. बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या संयोजन समितीचे सदस्य होते. त्यांच्या निधनामुळे बेळगुंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.