सोन्याची जर असलेल्या चार लाखाची साडी सौदती रेणुका देवीला अर्पण

बेलगाम प्राईड ; सत्तर वर्षांपूर्वी स्वामीजींनी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीला तब्बल साडेचार लाख रुपयांची सोन्याच्या जरीची साडी अर्पण करण्यात आली आहे. विजयपूर जिल्ह्यातील जंबगी येथील प्रभुदेव डोंगर येथील शिवयोगीश्वर महाराजांच्या इच्छेनुसार, रायचूर जिल्ह्यातील देवदुर्ग तालुक्यातील वीरघट्ट येथील आडविलिंग महाराज यांनी गुरुवारी हा नवस पूर्ण केला.
जंबगी येथील प्रभुदेव डोंगर येथील शिवयोगीश्वर महाराज रेणुका यल्लम्मा देवी मंदिरात आले. त्यावेळी त्यांनी आपण अशा पद्धतीची बनारसी साडी देवीसाठी भेट देण्याची मनोकामना व्यक्त केली होती. रेशमी धाग्यांनी सजवलेली आणि सोन्याची जर असलेली रेशमी साडी अर्पण करण्याचा त्यांचा नवस होता. तो नवस आता पूर्ण झाला आहे.
साडी अर्पण करण्याच्या वेळी वीरघट्टाचे आडविलिंग महाराज, विवेक चिंतामणी श्री, विजयपूर येथील व्यापारी बाबुरायगौडा बिरादार, कलावती बिरादार आदी उपस्थित होते.