
बेलगाम प्राईड / बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी म्हणून सरकारने चेतनसिंग राठोड यांची नियुक्त करण्यात आली असल्याने बुधवारी सकाळी मावळते आयजीपी विकासकुमार यांच्या कडून त्यांनी सूत्रे स्वीकारली
बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी विकासकुमार यांची अन्यत्र बदली करण्यात आली असल्याने चेतनसिंग राठोड यांनी बेळगाव उत्तर विभागाचे नवे आयजीपी म्हणून पदभार स्वीकारला. आयजीपी विकासकुमार विकास यांनी त्यांना अधिकारपदाची सूत्रे सोपवली. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नूतन आयजीपी चेतनसिंग राठोड यांनी सांगितले की, त्यांना, हावेरीत असताना उत्तर विभागात काम करण्याचा अनुभव आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य दिले जाईल.लोकहिताच्या दृष्टीने लोकाभिमुख पोलीस म्हणून काम करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले. गुन्हे कमी करण्यासाठी पोलिस ठाण्यांची संख्या वाढवण्यासाठी अभ्यास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगावचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रुती, बसापुरे आणि इतर अधिकाऱ्यांनी मावळत्या आयजीपी विकासकुमार यांना निरोप दिला आणि नूतन आयजीपी चेतनसिंग राठोड यांचे स्वागत केले.