Uncategorized

विजयेंद्र-जारकीहोळी भेटीने राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चा

 

बेलगाम प्राईड : एकीकडे मुडा घोटाळा उघडकीस आल्यामुळे अडचणीत आलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी, काँग्रेसमधील मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांची अंतर्गत हालचाल आणि अशा राजकीय वातावरणात मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी घेतलेली भेट यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत

… या भेटीमागचे नेमके कारण काय? भेटीदरम्यान कोणती चर्चा झाली? या भेटीमुळे कर्नाटकाच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता आहे का? अशा अनेक चर्चांना ऊत आला आहे.

आज सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन बी. वाय. विजयेंद्र यांना आपल्या विभागासंदर्भात निवेदन सादर केले. मात्र त्यांच्या या भेटीदरम्यान तासभराहून अधिक काळ त्यांनी चर्चा केल्याचे वृत्त असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नुकतीच एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्ली मुक्कामी भेट घेतली. मात्र या भेटीमुळेही सोशल मीडियावर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण आले. यावरून राजकीय चर्चा सुरु असतानाच आज अचानक बी. वाय. विजयेंद्र आणि सतीश जारकीहोळी यांच्या भेटीचे फोटोही वायरल झाले. मात्र आता या भेटीनंतर नव्या चर्चांची भर पडली असून उभयतांच्या भेटीमुळे सोशल मीडियावर मुख्यमंत्री पद बदलाचे वारे जोराने वाहू लागले आहेत.

भर कार्यक्रमात सतीश जारकीहोळी यांच्यासाठी त्यांच्या समर्थकांनी दिलेल्या मुख्यमंत्रीपदासाठीच्या घोषणा, लागोपाठ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेली भेट, विरोधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलेली भेट आणि यावरून सुरु असलेल्या चर्चा पाहता कर्नाटकात पुन्हा राजकीय बदलाचे वारे वाहू लागलेत कि काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button